पावसासाठी... बेडकाचं अन् गाढवाचं लग्न

राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.

Updated: Jul 13, 2012, 04:21 PM IST

www.24taas.com, सोलापूर

राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.

जुलै महिना अर्धा संपत आला तरी वरुणराजा म्हणावा तसा बरसला नाहीये. राज्याच्या अनेक भागात पावसानं ओढ दिलीये. त्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस भागातल्या गावकऱ्यांची वरुणराजा प्रसन्न होण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यासाठी त्यांनी चक्क बेडकाचं लग्न लावलंय. गावकऱ्यांनी लग्नात कुठलीही कसर सोडली नाही. वर पुर्नवसू आणि वध पुष्पला सजवून लग्न मंडपात आणण्यात आलं. साखरपुडा, हळदीचा कार्यक्रमही अगदी यशासांग पार पडला. तीन दिवसांचा हा विवाह सोहळा वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी होता. दुसरीकडे पाऊस पडावा यासाठी सातारा शहरात चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं. पारंपरिक पद्धतीनं हा लग्नसोहळा पार पडला. अगदी ख-या लग्नाप्रमाणं या लग्नाची तयारी करण्यात आली होती. फुलांचे हार, मुंडावळ्या, गुलाबाच्या फुलांचे गुच्छ, व-हाढी आणि वाजंत्री अशा थाटात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर नवरदेवाची वरातही काढण्यात आली. गाढवाचं लग्न लावल्यानं पाऊस पडेल अशी इथल्या जनतेची समजूत आहे.