मुंबईत आरपीआयला 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपचे नेते याबाबत चर्चा करत आहेत. मात्र आरपीआयला 30 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. रिपब्लीकन पक्षाला 30 पेक्षा जास्त जागा सोडण्यास युतीचे नेते तयार नाहीत. अजुनही काही वॉर्डबाबत वाद आहेत. युतीचे नेते त्यांच्या ताब्यात असलेल्या जागा सोडण्यास तयार नाहीत. जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा 30 तारखेला होण्याची शक्यता आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी जागा वाटप ही शिवसेना आणि भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता अधिक आहे. मुंबई
महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. रिपब्लीकन पक्षाला जागा कोणी सोडायच्या यावरुन सेना-भाजपामध्ये जुंपू शकते. एकीकडे मनसेचे वाढत्या आव्हानाचा सामना तर दुसरीकडे यूतीमध्ये आणखी एक वाटेकरी यात पक्षातल्या इच्छुकांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्याची कसरत सेना-भाजपाला करावी लागणार आहे. मनसे शिवसेना आणि भाजपाच्या मतांवर डल्ला मारणार हे नक्की असलं तरी त्याची भरपाई आरपीआय करु शकते. खडकवासला निवडणुकीत सेना-भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीरांचा विजयात आरपीआयने हातभार लावला.