राज्यात कमी मतदान, सत्ताधाऱ्यांना दिलासा?

राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

Updated: Feb 16, 2012, 07:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे.  गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

 

 

मतदारांची मतदानाकडे पाठ 

मुंबईत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आलाय.. मुंबईत बहुतांश मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवली. दुपारी साडे तीनपर्यंत मुंबईत अवघ्या २९.५१ टक्के मतदान झालंय. तर पुण्यात सुमारे ५०ते ५५टक्के मतदार झालय.  पुण्यात त्यामानानं चांगलं मतदान झालंय.  नाशिकमध्ये साडेतीन पर्यंत ४३ टक्के मतदान झालं. ठाण्यात तुलनेत चांगला प्रतिसाद होता. साडे तीन पर्यंत ४५ टक्के मतदान झालं. पिंपरी-चिंचवडमध्ये ५५ते ६० टक्के मतदान झालं. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झालं.

 

ग्रामीण उत्साहात मतदान

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला आणि उल्हासनगर या पाच महापालिकांसाठीही मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं. अद्याप मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आली नसली तरी साडेतीन वाजेपर्यंतच्या मतदानाच्या टक्केवारीवरुन मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून आलं. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात साडेतीन वाजेपर्यंत ४२.१४ टक्के मतदान झालं होतं. सोलापुरात ४६.४७ टक्के, अमरावतीत ४२  टक्के, अकोल्यात ५३ टक्के तर उल्हासनगरमध्ये ३३.२७ टक्के मतदान झालं होतं.

 

 

खासदार  परांजपेंची  सेनवर टीका

ठाण्यात महापालिकेसाठी मोठ्य़ा उत्साहात मतदान झालं. सामान्य नागरिक आणि नेत्यांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र शहराच्या सगळ्या भागात दिसून येत होतं. आमदार एकनाथ शिंदे यांनी किसन नगर क्रमांक दोन या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर भागात मतदान केलं. शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला. तसच कुणाकडे सत्ता जाईल हे ठाण्याची जनताच ठरवेल असंही त्यांनी सांगितलं.

 

 

हलकी शाई - नाईकांचा आरोप

मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई अत्यंत हलक्या दर्जाची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी केलाय. पूर्वी शाईचा वापर होत होता मात्र आता मार्कर पेनचा वापर केला जातोय. ही शाई रिमूव्हरने पटकन निघून जाते त्यामुळे बोगस व्होटिंगची भीतीही नाईक यांनी व्यक्त केलीय. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

 

 

अजित सावंत यांच्यावर हल्ला

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते अजित सावंत यांच्यावर मुंबईच्या माहिम भागात हल्ला झाला. चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या माहिम इथल्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर आणि कार्यालयीन कर्मचा-यांमुळं आपण बचावलो असल्याची प्रतिक्रिया अजित सावंतांनी दिली.  सदा सरवणकर आणि  काँग्रेस कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

 

 

 

पो