नको मोबाईलचा चाळा, अपघात टाळा

जवळजवळ 58 टक्के पुरूष आणि 53 टक्के महिला ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना ईमेल आणि एसएमएस करतात, असे डेली एक्सप्रेसने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

Updated: Sep 26, 2011, 04:09 PM IST

झी 24 तास वेब टीम, लंडन

[caption id="attachment_894" align="alignleft" width="300" caption="रस्ता ओलंडताना मोबाईलवर बोलणे टाळा"][/caption]

मोबाईल वेड्यांनो सावधान! रस्ता ओलांडतांना मोबाईल फोनचा वापर करणं हे आपल्या जीवावर बेतू शकते. जवळजवळ 58 टक्के पुरूष आणि 53 टक्के महिला ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना ईमेल आणि एसएमएस करतात, असे डेली एक्सप्रेसने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे, यात कॉलेज विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

 

या सर्वेक्षणातील एक तृतीयांश लोकांनी मान्य केले आहे की ते स्वत:च्या सुरक्षेबाबत अत्यंत बेफिकीर झाले आहेत. 10 पैकी एका व्यक्तिने सांगितले की रस्ता ओलांडताना ते आपल्या जवळील मोबाईलमध्येच गुंग असतात. 4 टक्के लोकांनी सांगितले की रस्ता ओलांडतानाही ते एसएमएस पाठवण्यातच मश्गुल असतात.

 

रस्त्यावर गाड्यांची वर्दळ असतानाही रस्ता ओलांडताना अनेक लोकांचे लक्ष हे फक्त त्यांचा आयपॉड आणि एमपी-3 प्लेयरकडेच असते, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे

 

Tags: