झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली
भारताच्या पश्चिम घाटांतील जंगलात 20 वर्षांच्या सखोल संशोधनानंतर रात्रीच्या वेळी सक्रिय होणाऱ्या बेडकांच्या 12 नव्या जाती शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. या खेरीज गेल्या 75 वर्षात नामशेष झालेल्या तीन जाती आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
दिल्ली युनिव्हर्सिटीतील प्रा. एस. डी. बीजू यांच्या नेतृत्त्वाखालील एका पथकाने हे महत्त्वपूर्ण संशोधनाचे काम केले आहे. या पथकाने निक्टिबॅट्रीकस जातीच्या निशाचर बेडकांच्या 12 जाती शोधण्यात यश मिळविले आहे. भारताच्या पश्चिम घाटातील भागाला नैसर्गिक जैव वैविध्येसाठी विशेष करून ओळण्यात येते.
मुंबईतील नैसर्गिक इतिहास सोसायटी, भारतीय जैव विज्ञान सर्वेक्षण आणि बेल्जियमच्या व्रिजे युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या नव्या जातीच्या बेडकांच्या शोधासाठी गुण आणि मार्किंग पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला.
याखेरीज या पथकाने गेल्या काही वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या तीन जातीच्या बेडकांचाही शोध केला आहे. यातील कोऑर्ग नाइट फ्रॉग (निक्टिबँट्राकस सॅन्कटीपालुस्ट्रिस) बेडकांना यापूर्वी 91 वर्षांपूर्वी पाहिले होते. तर कॅम्फोली नाइट फ्रॉग आणि फॉरेस्ट नाइट फ्रॉग यांना 75 वर्षांपूर्वी शेवटचे पाहिले होते.
जुटाक्सा जर्नलमध्ये या बेडकांचे उल्लेख आढळतो. या बेडकांच्या संबंध प्राचीन काळाशी येतो. डायनासोरच्या काळात या बेडकांच्या जाती पृथ्वीवर होत्या असेही जर्नलमध्ये मांडण्यात आले आहे.