जास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल

‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

Updated: Aug 1, 2012, 02:24 PM IST

www.24taas.com, सिडने

‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडमधील एका अभ्यासात समोर आलं आहे की ६०हून अधिक वयाचे लोक दररोज सरासरी चार तास टीव्ही पाहातात. त्यांच्याहून कमी वयाचे लोक दररोज ३ तास टीव्ही पाहातात.

‘यूक्यू स्कूल ऑफ पॉप्युलेशन हेल्थ’चे डॉ. पॉल गार्डिनर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन चालू आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात त्यांना दिसून आले, की जास्त टीव्ही पाहात राहिल्याने सुस्ती येते. यातून टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.