www.24taas.com, तेलअवीव
पेन किलर्स औषधं घेतल्यामुळे रक्तचाप वाढू शकतो. ही गोष्ट अजूनही वैद्यकिय क्षेत्रात सगळ्यांना माहित नसली, तरी एका अभ्यासात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. तेल अवीव युनिव्हर्सिटीच्या सॅकलर फॅकल्टी ऑफ मेडिसीनचे प्रोफेसर इहुद ग्रॉसमन यांनी सांगितलं, मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणारी बहुतेक पेन किलर्स ही रक्तचाप वाढवणारी असतात. यामुळे हृदरोगासारखे इतर विकार उद्भवू शकतात.
ग्रॉसमन यांनी 'अमेरिकन जर्नल ऑप मेडिसीन' यामध्ये काही औषधांचा उल्लेख केला आहे. गर्भनिरोधक गोळ्या, डिप्रेशन घालवणाऱ्या गोळ्या, बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या गोळ्या तसंच ऍसिडिटीवरील गोळ्यांचाही या गोळ्यांमध्ये समावेश होतो.
युनिव्हर्सिटीच्या मते अशा अनेक औषधांमुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा अतिरिक्त प्रभाव पडतो. बऱ्याचवेळा डॉक्टर्स ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर इलाज करताना ही गोष्ट ते सांगत नाहीत. या प्रकारची औषधं बऱ्याचवेळा डॉक्टरांची चिट्ठी न दाखवताही दिली जातात. त्यामुळे या औषधांमुळे काही धोका उद्भवू शकतो, ही गोष्ट फारशी कुणी मनावर घेत नाही. मात्र या प्रकारच्या गोळ्या बीपी वाढवू शकतात.