टीम इंडियाचं 'मिशन ऑस्ट्रेलिया'

१५ डिसेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरूवात होतेय. त्यामुळे सीरिजच्या इतर दोन वन-डेत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर भारताला प्रत्यक्ष ऑसी सीरिजमध्ये तोंडघशी पडावं लागण्याचीच अधिक चिन्हं आहेत.

Updated: Dec 8, 2011, 02:33 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाचे सीनिअर प्लेअर्स रवाना झालेत. मुंबई विमानतळावरून टीम इंडियातील सीनिअर्स रवाना झालेत. भारत आणि ऑस्टेलियातली टेस्ट मॅच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरत असते. जगभरातल्या क्रिकेट रसिकांचं लक्ष या लढतीकडे लागलेलं असतं. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानं या टेस्टचं काऊंटडाऊन सुरू झालंय.

 

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली..आणि विंडिजने विजयासह सीरिजमध्ये २-१ने खातं उघडलं. ऑस्ट्रेलिया दौ-याच्या पार्श्वभुमीवर टीम इंडियाची फ्लॉप बॅटिंग आणि स्लॉग ओव्हर्समध्ये मार खाणाऱ्या बॉलर्समुळे टीम मॅनेजमेंटच्या चिंतेत वाढ झालीय.

 

कटक आणि विशाखापट्टणम वन-डेमध्ये खराब बॅटिंगनंतरही टीम इंडियाने विजय मिळवले होते. मात्र याच कामगिरीची पुनरावृत्ती अहमदाबाद वन-डेत करण्यात यंगिस्तान अपयशी ठरली. मायदेशात इंग्लंडला ५-० ने व्हाईटवॉश दिल्यानंतर, टीम इंडिया विंडिजलाही क्लीन स्वीप देण्यास उत्सुक होती. मात्र अहमदाबाद वन-डेत १६ रन्सनी झालेल्या पराभवामुळे ब्लू ब्रिगेडचं क्लीन स्वीपचं स्वप्न भंगलं. होमपीचवर सलग ११ मॅचेस जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या पराभवाचं कारण ठरले ते हेच सिनियर प्लेयर्स.  अहमदाबाद वन-डेमध्ये इतर बॅट्समन फ्लॉप ठरत असताना मुंबईकर रोहित शर्माने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

 

बॅट्समनकरता नंदनवन असणाऱ्या अहमदाबादच्या याच मोटेरावर २६१ रन्सचं लक्ष्य टीम इंडियाची कसोटी पाहणारं ठरलं. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरसारखे चॅम्पियन्स खातंही खोलू शकले नाहीत. होमपीचवर भारतीय बॅट्समन फ्लॉप ठरत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फास्ट पिचेसवर या बॅट्समन्सचं काय होणार याचीच चिंता सर्वांना सतावतेय. भारतीय बॉलर्सचीही स्थिती तितकीशी चांगली नाहीये..चांगल्या स्टार्टनंतर शेवटच्या १० ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सना विंडिज बॅट्समन्सनी चांगलाच चोप दिला. अहमदाबाद वन-डे तर विंडिज बॅट्समन्सनी शेवटच्या १० ओव्हर्समध्ये ७३ रन्सची लयलूट केली. डॅरेन सॅमी आणि आंद्रे रसेलच्या झंझावातापुढे भारतीय बॉलर्सनी गुडघे टेकले. याआधी विशाखापट्टणम वन-डेतही रवी रामपॉल आणि केमार रॉच जोडीने ९९ रन्सची पार्टनरशिप करताना भारतीय बॉलर्सचा घामटं काढलं होतं.

 

१५ डिसेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरूवात होतेय. त्यामुळे  सीरिजच्या इतर दोन वन-डेत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर भारताला प्रत्यक्ष ऑसी सीरिजमध्ये तोंडघशी पडावं लागण्याचीच अधिक चिन्हं आहेत.