डेव्हिड वॉर्नर स्फोटक बॅट्समन म्हणून क्रिकेटविश्वात ओळखला जातो. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक बॅटिंगन त्यानं प्रतिस्पर्धी टीमला चांगलाच दणका दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरी ठोकत त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये दिमाखात एंट्री केली. भारताविरुद्धच्या आगामी सीरिजमध्ये कॅप्टन मायकल क्लार्कचं तो ट्रॅम्प कार्ड ठरु शकतो.
ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅट्स्मन डेव्हिड वॉर्नरकडे टी-२० चा स्पेशालिस्ट म्हणून पाहिलं जायचं. त्यानं कांगारुंना टी-२० मध्ये अनेक विजय मिळवून दिले. क्रिकेटच्या शॉर्टर वर्झनमध्ये आपल्या बॅटची कमाल दाखवल्यानंतर त्यानं वन-डे टीममध्ये स्थान मिळवलं. वन-डेमध्ये त्यानं आपल्य़ा बॅटचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच दिला. आता त्यानं टेस्टमध्येही आपल्या बॅटची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यानं माय़देशात टेस्टमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच टेस्टमध्ये फारशी कमाल त्याला करता आली नाही. पदार्पणाच्या मॅचमध्ये तो झटपट आऊट झाला. कांगारुंनी विजय़ मिळवलेल्या या मॅचमध्ये तो अपय़शी ठरला होता. दुसऱ्य़ा टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्याला या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देता आला नाही. एका बाजूला कांगारुंची पडझड होत असतांना त्यानं दुसरी बाजू लावून धरली. आपल्या दुस-याच टेस्टमध्ये त्याला आपल्या टीमला विजय मिळवून देता आला नाही त्यामुळे तो निराश झाला. त्याला आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही.
डेव्हिड वॉर्नरनं आत्तापर्यंत खेळलेल्या दोन टेस्टमध्ये ७६.५० च्या सरासरीनं १५३ रन्स केले आहेत. यामध्ये एका सेंच्युरीचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धची १२३ रन्सची नॉटआऊट इनिंग त्याची सर्वोत्तम ठरली आहे.टेस्टमध्ये कांगारुंसाठी त्यानं आपल्या दुसऱ्याच टेस्टमध्ये तारणहाराची भूमिका बजावली. त्याच्यामध्ये मॅचचं चित्र पालटण्याची गुणवत्ताही आहे. त्याची आक्रमक बॅटिंग आगामी टेस्ट सीरिजमध्ये भारतासाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे. त्याला रोखण्याच मोठ आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे