धोनीला नाही विश्रांती, हरभजनची गच्छंती

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमधून फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला दुखापतीमुळे

Updated: Oct 9, 2011, 02:23 PM IST

इंग्लडविरुद्धच्या दोन वन डेसाठी टीम जाहीर

 

 

झी २४ तास वेब टीम, चेन्नई

 

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमधून फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला दुखापतीमुळे वगळण्यात आलं आहे. शिवाय अपेक्षेप्रमाणेच सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवागला स्थान मिळालेलं नाही.

 

तर कर्नाटकचा मध्यमगती गोलंदाज एस. अरविंद आणि पंजाबचा फिरकी गोलंदाज राहुल शर्मा या नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या सामन्यांमधून ते आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याची सुरुवात करणार आहेत.

 

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह, रोहित शर्मा, हरभजनसिंग झहीर खान, मुनाफ पटेल आणि इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे या सामन्यांसाठी वगळण्यात आलं आहे. आशिष नेहराने आपण फिट असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यालाही संघात स्थान मिळालेलं नाही.

 

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या साथीने अजिंक्य रहाणे आणि मनोज तिवारीला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर इंग्लंड दौऱ्यात संधी न मिळालेल्या वरूण अॅरॉन आणि उमेश यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

 

निवडलेला भारतीय संघ

महेंद्रसिहं धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, वरुण अॅरॉन, उमेश यादव, विनय कुमार, एस. अरविंद, राहुल शर्मा, मनोज तिवारी, प्रवीण कुमार.