धोनीवर संक्रात, एक टेस्टसाठी बंदी

महेंद्र सिंग धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे एक टेस्ट मॅचसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ऍडलिड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. त्याच्या गैरहजेरीत विरेंद्र सहवाग कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

Updated: Jan 15, 2012, 04:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

महेंद्र सिंग धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे एक टेस्ट मॅचसाठी बंदी घालण्यात  आली आहे त्यामुळे ऍडलिड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. त्याच्या गैरहजेरीत विरेंद्र सहवाग कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

भारताना ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या टेस्टी सिरीजमध्ये सलन तीन टेस्ट मध्ये मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता महेंद्र सिंग धोनीवरील बंदीमुळे भारताच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. पर्थच्या टेस्टमध्ये भारताला तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ३७ धावांनी दारुण पराभव पत्कारावा लागला.

पर्थ टेस्टमधील पराभव हा परदेशातील भारताचा सलग सातवा पराभव आ. भारताने पूर्ण कोटा बॉलिंग न टाकल्यामुळे धोनीवर बंदीची शिक्षा लागु करण्यात आली. भारताने निर्धारित कोट्या पेक्षा दोन ओव्हर्स कमी टाकल्या. याआधीही धोनीला बॉलिंगचा कोटा पूर्ण करताना अवघड गेलं आहे.  ऍडलिडला चौथी आणि शेवटची टेस्ट २४ जानेवारीपासून सुरु होणार आहे.