टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियासमोर आव्हान असणार ते ट्राय सीरिज जिंकण्याचं. युवा ब्रिगेड आणि वनडे स्पेशलिस्टमुळे टीम इंडिया नव्या दमानं ट्राय सीरिजमध्ये उतरणार. भारताचा धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैनाही ऑस्ट्रेलिविरुद्ध ट्राय सीरिज खेळण्यासाठी आतूर आहे. वनडेमधील सचिनच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाला ट्राय सीरिजमध्ये निश्चित फायदा होणार असल्याच रैनानं सांगितलं.
ऑस्ट्रेलियात टीम इंडियानं टेस्ट सीरिज गमावली. आता आगामी वनडे ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाचा कस लागणार आहे. भारताचा धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैनानंही ऑस्ट्रेलियातल्या बॉऊन्सी पीचवर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्वाचं म्हणजे ट्राय सीरिजमध्ये सचिनही खेळत आहे. त्यामुळे त्याचा फायदाही टीम इंडियाला निश्चितच मिळणार.
वनडेत रन्स काढण्याबरोबर रन्स रोखणं गरजेच आहे. त्यामुळे फिल्डिंगमध्ये रैना, रोहित, जाडेजावर फिल्डिंगची प्रमुख जबाबदारी असणार आहे भारतानं यापूर्वी ऑस्ट्रेलियात सीबी सीरिज जिंकली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा यंगब्रिगेड भारताला ऑस्ट्रेलियात ट्राय सीरिज जिंकून देण्यात यशस्वी ठरते का याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.