www.24taas.com, हैदराबाद
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधील मुंगेरमध्ये ही कारवाई करण्यात आली. एनआयएच्या टीमनं या दहा जणांना ताब्यात घेतलयं. मोबाईल सिमकार्डच्या रेकॉर्डच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतयं.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एकानं मुंगेरमधून सिमकार्ड विकत घेतलं होतं. या सिमकार्डाच्या आधारे एनआयएनं ही कारवाई केलीय.
हैदराबाद बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए) कडे सोपवण्यात आलाय. या स्फोटाच्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
२१ फेब्रुवारीच्या संध्याकाळी शहरातील गजबजलेल्या भागात – दिलसुखनगरमध्ये – काही मिनिटांच्या अंतरात दोन बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. यामध्ये १७ जणांनी आपले प्राण गमावले तर ११७ जण जखमी झाले होते.