
हैदराबाद बॉम्बस्फोट : १० जण ताब्यात
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधील मुंगेरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

हैदराबाद बॉम्बस्फोट : मंजर इमामला अटक
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पहिली अटक झाली आहे. झारखंडच्या रांचीमधून पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केलीय. मंजर इमाम असं या इसमाचं नाव आहे.

हैदराबाद बॉम्बस्फोट : मिशन ‘देशमुख’
हैदराबादला बॉम्बस्फोट घडवून आणताना इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं सुनियोजित योजना आखली होती. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या तेराव्याला (मृत्यूनंतर १३व्या दिवशी) हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या योजनेचं नाव होतं... `मिशन देशमुख`.

हैदराबाद बॉम्बस्फोटांमागे यासिन भटकळच!
हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटांमागे पुणे बॉम्बस्फोटांचा सूत्रधार यासीन भटकळचाच हात असल्याचं तपासात आता स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र एटीएसनं ज्या चार दहशतवाद्यावंर प्रत्येकी दहा लाख रुपयांचं बक्षिस घोषित केलं होतं.

हैदराबाद स्फोट : शांतता राखा - पंतप्रधान
हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.

हैदराबाद स्फोट : एमआयएमच्या पदाधिका-याची चौकशी
हैदराबादमधील स्फोटप्रकरणी नांदेडमधल्या एमआयएमच्या वरिष्ठ पदाधिका-यांची काल रात्री कसून चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसनं ही चौकशी केलीय. एटीएसनं आता एमआयएमवरही लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. कारण यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मराठवाडा कनेक्शन समोर आलंय.

पंतप्रधान, सोनिया गांधी आज हैद्राबादमध्ये
हैदराबाद दोन बॉम्बस्फोटानंतर गुरवारी हादरलं. त्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हैद्राबादमध्ये जाणार आहेत.

बॉम्बस्फोटाची माहिती द्या, १० लाख जिंका
दिलसुखनगर येथील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणचं `CCTV` फूटेज पोलिसांना मिळाले आहे. `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण? याची माहिती मिळत नाही. असे असले तरी या स्फोटाविषयी माहिती देणाऱ्याला दहा लाख रूपयांचं बक्षिस देण्याचे जाहीय करण्यात आले आहे. तशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली.

हैदराबाद स्फोट : महाराष्ट्र करणार सर्वोतोपरी मदत
तपास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

हैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली
हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.

स्फोटांत ‘अमोनिअम नायट्रेट’चा वापर...
हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात.

हैदराबाद बॉम्बस्फोटाचं मराठवाडा कनेक्शन...
हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड होतंय. पुणे स्फोटांतला आरोपी सईद मकबूलनं हैदराबादेत रेकी केल्याचं समोर आलंय.

हैदराबाद स्फोट : हेल्पलाइन नंबर
हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर संबंधितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही तुम्हाला मदत हवी असल्यास संपर्क करू शकता.

हैदराबाद स्फोट : अफजल गुरुच्या फाशीचा बदला
संसद हल्ल्याचा सूत्रधार अजफज गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येतेय. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलिकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय.

'पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती'
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली.

हैदराबाद हादरलं
हैदराबादचा दिलसुखनगर भाग पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 11 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

पंतप्रधानांचं शांततेचं आवाहन, पीडितांना मदत जाहीर
हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे. “हा अत्यंत नृशंस हल्ला आहे. या हल्ल्याच्या दोषींना कडक शासन करण्यात येईल. तसंच सामान्य जनतेने न घाबरता शांतता राखावी.”

ऑस्ट्रेलिया टीमचा हैदराबादला न जाण्याचा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये उद्या शुक्रवारीपासून क्रिकेट कसोटी सामने सुरू होत आहेत. उद्या चेन्नईत सामना होत आहे. मात्र, २ मार्च रोजी होणाऱ्या हैदराबादमधील कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले
हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे

हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.