www.24taas.com, मुंबई
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. राजकारण, संगीत, क्रीडा, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, व्यवसाय, सामाजिक कार्य, शेती, पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेकांनी आपली छाप सोडली आहे. अनेक मराठी व्यक्तींचा देशाच्या यशात सिंहाचा वाटा आहे.
आजच्या प्रसिद्धीसाठी काही करणाऱ्यांच्या जमान्यात प्रसिद्धीच्या मागे न धावता स्वच्छ अंतःकरणानं काम करणाऱ्या वल्ली महाराष्ट्राच्या माती आपली छाप सोडत आहेत. आपल्या क्षेत्रात काम करताना त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली आहे. आता अद्भूत कामगिरी करणाऱ्या वल्लीची जगाला ओळख करून देण्याची वेळ आहे.
अनन्य सन्मानाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील अद्वितिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. तर २००९ आणि २०१० या वर्षी रिअल हिरोंना सन्मानित करण्यात आले.
गेल्या चार वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही विविध क्षेत्रातील रिअल हिरोंना सन्मानित करण्यात येणार आहे. यात... मनोरंजन, क्रीडा, शेती, शिक्षण, समाज कार्य आणि शौर्य. या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.
अनन्य सन्मानाबद्दल काय आहे तुमचं मत.... तसेच आम्हांला कळवा तुमच्या आसपासचे अनन्य व्यक्तीमत्व.... त्यांनी केली अद्वितीय कामगिरी.... या कामगिरीला आम्ही करू मानाचा मुजरा....
आपल्या प्रतिक्रिया आणि अनन्य व्यक्तिमत्त्वाची माहिती देण्यासाठी खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करा......