www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये काम मागण्याच्या बहाण्यांनी दोन चोरांनी एका वृद्धेच्या मंगळसुत्रावरच डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका दहा वर्षाच्या मुलानी आपल्या साहसाने त्यांचा हा बेत हाणून पाडला.
या १० वर्षांच्या ऋषिकेशच्या साहसाचं सध्या औरंगाबादेत कौतुक सुरु आहे. अगदी मोठ्यांनाही लाजवेल असं साहस या चिमुरड्याने दाखवलंय. ऋषीचे वडिल औरंगाबादच्या उल्कानगरी भागातील तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये वॉचमन आहेत. ऋषिकेश तिथेच एका घरात राहतो. याच इमारतीत राहणाऱ्या ६९ वर्षीय शारदा कुलकर्णी यांच्या घरात दोन भामटे काम मागण्याच्या बहाण्याने घरात घुसले आणि या आजीच्या अंगावर झडप मारून थेट त्यांचे अडीच तोळ्यांचं मंगळसूत्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजीने आरडाओरड सुरु केला. हा आरडाओरड ऋषिकेशनेही ऐकला तो घरातून बाहेर आल्यावर त्याला चोर पळताना दिसला त्याने क्षणाचाही विचार न करता थेट दगड उचलून चोरट्यावर नेम साधला. दगड लागल्याने चोरटा खाली पडला. हातातील मंगळसूत्र तेथेच सोडून चोरट्याने धूम ठोकली. त्यानंतर जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या आजींना रहिवाशांनी ते मंगळसूत्र आजींच्या स्वाधीन केलं. मात्र, या सगळ्या घटनेचा हिरो ठरला तो चिमुरडा ऋषिकेश...
चोरट्यांना या चिमुकल्याने चांगलीच अद्दल घडवली. मंगळसूत्र हिसकावताना चिमुकल्याचे धाडस कौतुकास्पद आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शहरात मंगळसूत्र चोरीचे प्रमाण वाढले आहे शहरातील नागरिकांनी सुद्धा हृषीकेशसारखे सहस दाखवले तर मंगळसूत्र चोरांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.