www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमधून एटीएमचा पासवर्ड क्रँक करून चोरी केलेले १५ लाख रुपयाच्या प्रकरणाला नव वळण मिळालंय. गुरुवारी सकाळी अज्ञातांनी १५ लाख रुपये चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या आवारात फेकून पसार झालेत. त्यात पोलिसांच्या नावानं माफ करा, अशी चिठ्ठीही आहे.
‘मी औरंगाबादला मामाच्या गावाला गेलो होतो. एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलो पैसे निघाले नाहीत. मी एटीएमला लाथ मारली, तसा पैशांचा ट्रे उघडला. मी पैसे एका बॅगेत भरले. मात्र, आता मला पश्चाताप होत आहे. त्यामुळे मी हे पैसे परत करतोय मला माफ करा’, औरंगाबाद एटीएममधून पैसे चोरणाऱ्या हायटेक चोरानं लिहिलेला हा माफीनामा... या चोरानं मध्यरात्री एका बॅगेत १५ लाख रुपये भरुन ती बॅग चिखलठाणा पोलीस स्टेशनच्या आवारात फेकले आणि तो पसार झाला. त्यानंतर एका हवालदाराला ही बॅग सापडली.
या चोरीप्रकरणी यापूर्वीच पोलिसांनी दोघांना अटक केलीय जर पैसै या चिठ्ठीवाल्या चोरट्याने चोरले होते तर अटक करण्यात आलेले आरोपी कोण? असा प्रश्न या निमित्तानं आता सगळ्यांसमोर उभा राहिलाय. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या चोरी नाट्यावर पडदा पडल्याने पोलिसांचा जीव मात्र भांड्यात पडला.
‘एटीएम’चा १२ अंकी पासवर्ड क्रॅक करून हायटेक पद्धतीने एटीएम फोडण्याची ही राज्याची पहिलीच घटना असावी. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरेही चोरले होते त्यामुळे ही चिठ्ठी पोलिसांचा तपास भुलवण्यासाठीच आहे यात कुठलीही शंका नाही. मात्र, कारण काहीही असो पैसै हस्तगत झाल्याने पोलीसांचा ताप मात्र कमी झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.