www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
15 ऑगस्टपासून मराठवाड्यातील खाजगी शाळांमध्ये खिचडी न शिजवण्याचा निर्णय़ घेतला आहे.. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर मराठवाड्यातीळ शाळांमध्ये खिचडी शिजणार नाही..बिहारच्या मध्यान्न पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय...
मराठवाड्यात 7000 खाजगी शाळा आहेत, या शाळांच्या संघटनेनं हा निर्णय़ घेतलाय.. मध्यान्न भोजन योजनेसाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा तयार करावी आणि त्यामार्फत खिचडी पुरवावी अशी मागणी या शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेतलीये..
शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकांवर ते काम लादू नये, शिक्षकांचे काम अध्यापनाचे आहे, शिचडी शिजवण्याचे नाही ही भूमिका या संघटनेनं घेतलीये.. सध्या तरी मराठवाड्यातील 7 हजार शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय़ घेतलाय...
त्यानंतर येत्या 16 ऑगस्टला नाशिकमध्ये खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांची बैठक आहे.. राज्यातील 31 हजार खाजगी शाळाही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.