शत्रूंचं भय वाटत असल्यास...

अनेकदा आपल्या कामात शत्रूंचा अडथळा जाणवत असतो. आपले नेमके हितशत्रू कोण हेदेखील माहित नसतं. अशा लोकांमुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःचं कसं संरक्षण करावं, हा बऱ्याच जणांपुढे मोठा प्रश्न असेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 10, 2013, 07:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनेकदा आपल्या कामात शत्रूंचा अडथळा जाणवत असतो. आपले नेमके हितशत्रू कोण हेदेखील माहित नसतं. अशा लोकांमुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःचं कसं संरक्षण करावं, हा बऱ्याच जणांपुढे मोठा प्रश्न असेल. शत्रूंची भीती घालवण्यासाठी शास्त्रांमध्ये मंत्र दिला आहे. हा मंत्र शत्रूपासून आपलं रक्षण करतो.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. हनुमान यंत्र समोर ठेऊन पूर्व दिशेला तोंड करून बसावे. हनुमान यंत्रासमोर बसून पुढील मंत्राचा जप करावा, गुळाचा नैवैद्य दाखवावा. जप करण्यासाठी लाल रंगाची माळ वापरल्यास अधिक फायदा होतो.
मंत्र
मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशन। शत्रून संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो।।

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई