बाळासाहेबाचं स्मारक कुठे आणि कसे व्हावे, मांडा आपलं रोखठोक मत
शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्यक्त करा तुमच्या भावना...
‘मित्रांसाठी मित्र आणि शत्रूंसाठीही दिलदार शत्रू’ म्हणून ओळखल्या जाणा-या बाळासाहेबांसाठी तुम्हालाही संदेश द्यायचा असेल, व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्या भावना तुम्ही ‘झी २४ तास’च्या माध्यमातून शेअर करू शकता...
शेतकऱ्यांचा वाली कोण?
एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.
दिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही
झी २४ तास घेऊन आलंय मिशन दिवाळी. आपण ठरविल्यास फटाक्यांचा वापर बंद करून ध्वनी आणि वायू प्रदुषणावर आळा आणू शकतो. तसेच फटाक्यांमध्ये व्यर्थ जाणाऱ्या पैश्यांचा सदुपयोग करून, लाखो गरजुंची दिवाळी आनंददायी बनवू शकतो. या मिशनला तुमच्या सहयोगाची गरज आहे.
देशाचं सरकार अंबानी चालवतात का?
देशातील सरकार अंबानी चालवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
सर्व पक्ष साटंलोटं करून मालामाल होत आहेत का?
अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.
वढेरांवरच्या आरोपांची योग्य चौकशी होणार?
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची योग्य चौकशी होणार का? सोनिया गांधी यांचा जावई असल्यानं वढेरा यांना काँग्रेस पाठिशी घालतंय का? काय वाटतंय तुम्हाला...
अजित पवारांच्या राजीमान्याचं कारणं काय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जलसंपदा खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचे कारण देऊन पवार यांनी राजीमाना दिला आहे.
टीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?
आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.
आता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!
विज्ञान युगात दर दिवसाला काही ना काही तरी प्रयोग केले जातात. असाच एक नवीन प्रयोग यंत्रमानवार करण्यात येत आहे. लवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.