www.24taas.com, मुंबई
आपला हा विकेण्ड ठरणार तरी कसा.. पाहा खास ह्या विकेण्डचा फिल्म रिव्ह्यू या विकेण्डला 3 हिंदी आणि 2 मराठी फिल्म्स बॉक्स ऑफिसवर झळकल्या... प्रेक्षकांनी कुणाला केलं इन आणि कुणाला केलं आऊट त्याचाच हा बॉक्स ऑफिस रिपोर्ट.. मराठी प्रेक्षकांसाठी हा विकेंन्ड खास ठरला तो तुह्या धर्म कोंचा आणि आकांत या दोन वेगळ्या विषयांवरील सिनेमांमुळे... तुह्या धर्म कोंचा या सिनेमात आदिवासी कुटुंबात घडणारी कथा दाखवण्यात आलीये...उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे, किशोर कदम यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत त्यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिलाय...
विशेष म्हणजे अहिराणी भाषेतून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... धर्मांतर हा विषयच या सिनेमाला वेगळा ठरवतो.....या सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शो 40-45 टक्के ओपनिंग मिळालंय.. तर आकांतमध्ये पारधी समाजातील कथा आणि व्यथा मांडण्यात आल्यायत.. पारधी समाजाची आजची परिस्थिती त्यातच जन्माला आलेली एक निखळ प्रेमकथा आणि त्याला लागलेलं सावकारीचं गालबोट.... हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलाय मानसिंग पवार या दिग्दर्शकानं...मात्र प्रेक्षकांना विशेष भावला तो तुह्या धर्म कोंचा हा सिनेमा. तर हिंदीत 3 जी हा थ्रीलर आणि हॉरर सिनेमा...
सॅम अरोरा आणि शीना या कपलभोवती सिनेमाचं कथानक फिरतं.. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या कपलच्या आयुष्यात अचानक अघटीत घटना घडायला लागतात आणि तेसुद्धा केवळ एका मोबाईलमुळे... या सिनेमाला मिळालं 45 टक्के ओपनिंग त्यामुळे थ्रील अनुभवण्यासाठी हा ऑप्शन नक्कीच चालू शकेल....तर मेरे डॅड की मारुती हा धमाल कॉमेडी सिनेमाही बॉक्स ऑफिसर झळकला.
नवखे कलाकार आणि राम कपूरचा वेगळा अंदाज याला प्रेक्षकांनी दिलं 40 टक्के ओपनिंग.. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कॉमेडीच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेला जॉली एल एल बी मध्ये पुन्हा जुगलबंदी अनुभवायला मिळाली ती अभिनेता बोमन इरानी आणि अर्शद वारसीची सो प्रेक्षकांनी याच जुगलबंदीला पसंती देत दिलं 55 टक्के ओपनिंग. एकुणच या आठवड्यात कॉमेडी, थ्रीलर आणि सोशल अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांचे ऑपशन्स तुमच्याकडे आहेत.. so enjoy your weekend..