आयुर्वेदिक पावडरमुळे ऋचा अडकली चौकशीच्या फेऱ्यात...

चित्रपट `ओये लकी` ची फेम अभिनेत्री ऋचा चड्ढाला दिल्लीच्या विमानतळावर चौकशीचा सामना करावा लागला आहे. ऋचाजवळ असलेल्या आयुर्वेदिक पावडर संशयित मिळाल्याने दोन तास तिची चौकशी करण्यात आली.

Updated: Jun 21, 2014, 03:38 PM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था,नवी दिल्ली
चित्रपट `ओय लकी` फेम अभिनेत्री ऋचा चड्ढा हिला दिल्लीच्या विमानतळावर चौकशीचा सामना करावा लागलाय. ऋचाजवळ असलेल्या आयुर्वेदिक पावडर संशयित असल्यानं अधिकाऱ्यांकडून तिला चौकशीसाठी थांबवण्यात आलं होतं.
ऋचा आपल्यासोबत आयुर्वेदिक पावडर घेऊन प्रवास करत होती. सामानांची तपासणी करताना सुरक्षा अधिकाऱ्यांना ऋचा जवळची पावडरवर संशल आला, म्हणून तिला थांबवण्यात आलं.
चौकशीदरम्यान ऋचाने अधिकाऱ्यांना, 'ती आयुर्वेदिक पावडर आहे... त्याचा उपयोग मी माझ्या त्वचेच्या उपयोग करते. या पावडरमुळे मला खूप फायदा झालाय. मी दररोज आयुर्वेदिक पावडर वापरतेय तसंच माझा आयुर्वेदिक प्रसाधनांवर विश्वास आहे त्यामुळेच मी प्रवास करतानाही आयुर्वेदिक प्रसाधनं जवळ ठेवते' असं स्पष्टीकरण दिलं.
आपण मुंबईला जात असताना आपल्या सामानात आयुर्वेदिक सामान होते... आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना ते संशयास्पद वाटलं. मला हे पटत नव्हतं की त्यांनी माझ्याजवळचं सगळं सामान जप्त करावं, कारण ते सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि ती खास करुन माझ्यासाठी बनविली होती, असं स्पष्टीकरण दिलं.
या सामानात काहीही संशयास्पद नसल्याचं मी अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण, ते त्यांचं काम करत होते... त्यामुळे मी त्यांना सहकार्यच केलं, असंही ऋचानं म्हटलंय.

ऋचानं गैंग ऑफ वासेपुर, ओय लकी, फुकरे अशा चित्रपटांत अभिनयाची छाप सोडलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.