WWW.24taas.com,मुंबई
अभिनेता सलमान खान नेहमीच कोणाची थट्टा करण्यात पटाईत आहे, पण सध्या तो नाराज असल्याच समजतय. त्याच्या नाराजीच कारण म्हणजे आज आपल्या २० वर्षाच्या कारकीर्दीत सलमान खान हा पहिल्यांदाच एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे होस्टिंग करणार आहे. नेहमीच दुस-यांची टींगल करताना दिसतो पण आज त्याच्यावरच मंच सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच तो नाराज असल्याच समजतय.
कोणीही पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करतो तेव्हा तो थोडा नाराजच असतो, मला सुद्धा थोडीसी नाराजी जाणवतेय अशी माहिती शनिवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमा नंतर पत्रकारांशी बोलताना त्याने दिली. मी ही असा विचार करत होतो की आपणही एखाद्या कार्यक्रमाचा अँकरींग करुन पाहूया
सलमान खानने सांगितल की अँकरींग करणे हे अभिनय करण्यापेक्षा खूप कठीण असत. हा अनुभव मला अँकरींग करताना आला आहे .कारण अँकरींग करताना आपण थेट प्रेक्षकांशी संवाद साधत असतो. लोकांच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला सांभळून पाऊल उचलावे लागते.
सलमान आपल्या या कार्यक्रमाच्यावेळी आपल्याच अंदाजात दिसला आपल्या याच अदाकारीने त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.
मुंबईच्या यशराज स्टुडियोत हा पुरस्कार सोहळा पार पडला होता, त्यावेळी सोहळ्याच आकर्षण ठरलेल्या सलमान खानच अभिनेता अर्षद वारसी याने ट्विटरवर ट्विट करून अभिनंदन केले.
अर्षदने सांगितल की, सलमान खानची गोष्टच वेगळी आहे आणि म्हणूनच तो प्रेक्षकांचा आवडता स्टार आहे.