सर जाडेजा ‘नंबर वन’!

टीम इंडियाचा अव्वल स्पिनर रवींद्र जाडेजानं आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 5, 2013, 09:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाचा अव्वल स्पिनर रवींद्र जाडेजानं आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतलीय.
आयसीसीनं जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये जाडेजा ७३३ पॉईंट्सह वेस्ट इंडिजच्या सुनिल नरेनसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. आपल्या वन-डे करिअरमधील जाडेजाचं हे अव्वल रँकिंग आहे. इतकेच नव्हेय तर जडेजा शाकिब अल हसनबरोबर अष्ट पैलू खेळाडूंच्याज यादीत दुस-या क्रमांकावर आहे. गेल्या सहा महिन्यामध्ये जाडेजाची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे आणि याचाच फायदा त्याला आपलं रँकिंग सुधारण्यात झाला. झिम्बाब्वे सीरिजमध्ये त्याला पाच मॅचेसमध्ये केवळ पाच विकेट्स घेता आल्या होत्या.

बॉलर्समध्ये अव्वल स्थान गाठणारा जाडेजा हा अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी १९९६ मध्ये कुंबळे बॉलर्सच्या रँकिंगमध्ये नंबर वनवर होता तर ऑलराऊंडरच्या रँकिंगमध्ये जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.