www.24taas.com, बंगळुरु
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी न्यूझीलंडनं सहा विकेटच्या बदल्यात ३०० धावांचा टप्पा पार केलाय.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. झहीर खानने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये ब्रॅण्डन मॅक्युलमला शून्यावर बाद केलं. न्यूझीलंडला सुरवातीलाच धक्का देऊन टीम इंडियाने न्यूझीलंडवर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आलेल्या मार्टिन गप्टिल आणि केन विल्यमसन यांनी ६३ रन्सची भागीदारी केली. गप्टिलनं ५३ रन्स दिले पण गंभीरनं त्याचा ‘कॅच’ नेमका पकडला. तर विल्यमसन 17 धावा काढून बाद झाला. रॉस टेलरनं मात्र शतक झळकावलं. त्यानंतर त्याला ११३ रन्सवर प्रज्ञान ओझानं बाद केलं. फ्लायननं ३३ रन्स केले. त्यानंतर आलेल्या जेम्स फँकलिनला (८ रन्स) रैनानं बाद केलं. सध्या डग ब्रासवेल आणि वॅन विक ही जोडी मैदानात खेळत आहे. भारताकडून प्रग्यान ओझाने ४, झहीरने १ आणि अश्विने १ बळी घेतला. न्यूझीलंडकडून टेलर ११३ आणि गुप्टीलने ५३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडनं दिवसाअखेर ३२८ रन्स केलेत.
भारतीय संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. किवी संघाने आपल्या टीममध्ये काही बदल केलेत. वेगवान कोलंदाज ख्रिस मार्टिनच्या जागी टिम साउथीला संधी देण्यात आली आहे. मात्र कर्णधार धोनीने आपल्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.