www.24taas.com, झी मीडिया, सेंच्युरियन
लागोपाट दोन पराभवानंतर तिसर्या वनडेतही भारताचा पराभव दिसत होता. मात्र, भारताच्या मदतीला पाऊस धाऊन आला. दोन तास कोसळलेल्या पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यामुळे भारताचा व्हाईटवॉश टळला आहे.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हे आव्हान भारत पेलू शकणार नाही, असेच दिसत होते. जवळपास दोन तास पावसाच्या बॅटींगनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारताची ०-३ अशी शुभ्र धुलाई होता होता टळली.
भारताचा घाम काढणार्या क्विंटन डी कॉकला मालिकावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. त्याआधी सलामीवीर क्विंटन डी कॉक (१०१)आणि कर्णधार एबी डिव्हिलियर्स (१०९) यांच्या शतकांच्या बळावर आफ्रिकेने ५० षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात ३०१ धावा फटकावल्या. नाणेफेक जिंकून डिव्हिलियर्सने फलंदाजी स्वीकारली.
आठव्या षटकांपर्यंत आफ्रिकेला तीन बाद २८ असे रोखणार्या भारतीय गोलंदाजांना यानंतर प्रभावी मारा करण्यात अपयश आले. मात्र, कॉकने १२० चेंडू टोलवून नऊ चौकार आणि दोन षटकारांसह १०१ धावा ठोकल्या. कर्णधार डिव्हिलियर्स देखील मागे नव्हता. त्याने १०१ चेंडू टोलवून सहा चौकार आणि पाच उत्तुंग षटकारांसह १९९ धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १७१ धावांची भागीदारी केली. ईशांतने डी कॉकलात्रिफळाचीत तर उमेश यादवने डिव्हिलियर्सला पायचित करीत मोठा अडथळा दूर केला.
भारतीय फिरकी मारा निष्प्रभ ठरल्यामुळे अखेरच्या टप्यात मात्र डेव्हिड मिलरने ३४ चेंडूंत नाबाद ५६ धावा ठोकून संघाला ३०० चा पल्ला गाठत भारतासमोर मोठे आव्हान उभे केले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.