www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ब्युरो
झिम्बाब्वेच्या टीमचा कोहलीच्या यंगिस्ताननं वन-डे सीरिजमध्ये 5-0 नं धुव्वा उडवला. मात्र आता झिम्बाब्वे पराभूत होणार नाही. याच कारण आहे टीम इंडियाच.. भारतीय टीमला ऐतिहासिक विजय मिळवून देणार कोहली आता कोच बनलाय. विराटनं झिम्बाब्वेच्या टीमला कोणता गुरुमंत्र दिला आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट...
भारताने झिम्बाब्वे विरोधातील सिरीज ५-० ने जिंकली. जिंकल्याच्या जल्लोषाची दृश्य आपण पाहिली असतील.. मात्र, यानंतरची दृश्य तुम्ही पाहिली आहेत का ? विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये काय झालं ?
तुम्ही विचार करत असाल हा कसा प्रश्न आहे ? याचं उत्तर संपूर्ण जगाला माहित आहे. झिम्बाब्वेला 5-0 नं पराभूत केल्यानंतर टीम इंडियानं ड्रेसिंग रूममध्ये विजयी जल्लोष केला. मात्र, जर तुम्ही असाच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जे झालं याचा विचार कोणीही करू शकणार नाही. काय आहे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील इनसाइड स्टोरी..
ड्रेसिंग रुमची इनसाईड स्टोरीः टीम इंडिया बनली गुरु
अखेरच्या बुलावायो वन-डेमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आपल्या ड्रेसिंग रुमध्ये विजयी जल्लोष करत होती. त्याचदरम्यान काही पाहुणे आले. हे चेहरे काही नवीन नव्हते. तर झिम्बाब्वेच्या टीममधील क्रिकेटपटू होते ज्यांना कोहलीच्या टीमनं परास्त केलं होतं.
शेवटच्या वन-डेमध्ये पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वेच्य टीमला भारतीय टीमच्या यशाचं गमक जाणून घ्यायचं होतं.
बॅटची जादू असो वा बॉलिंगमधील कमाल... आपल्या पराभवाला ज्या-ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्या सर्व भारतीय टीमकडून झिम्बाब्वेच्या टीमला जाणून घ्यायच्या होत्या.
शिकण्याची वेळ आता ड्रेसिंग रुममध्ये आहे. जिथे क्रिकेट जगतातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत. जर दुस-यांसमोर तुम्हाला बोलायचं नसेल तर एकेक करून संवाद साधण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. टीम इंडियाकडून झिम्बाब्वेच्या टीममधील क्रिकेटपटूंना बरच काही शिकण्यासारखं आहे.
झिम्बाब्वेच्या टीमनं बराच वेळ भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये घालावला.
झिम्बाब्वेच्या टीमला दिला गुरुमंत्र
विराट कोहली अँड कंपनीनं झिम्बाब्वेच्या टीमला यशाचा गुरुमंत्र दिला. झिम्बाब्वेच्या संपुर्ण टीमला आणि कोचला भारताकडून मिळालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता भारतीय टीमनं दिलेला गुरुमंत्र मैदानावर आजमावण्यास झिम्बाब्वेची टीम सज्ज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.