www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ म्हणजेच ‘आरसीबी’चा कर्णधार विराट कोहली हा युवराज सिंगवर फिदा आहे. त्यामुळेच युवराजला आपल्या संघात घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात त्यानं आरसीबी संघ व्यवस्थापनाशी चर्चाही केलीय.
पुढच्या महिन्यात १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी ‘आयपीएल सीझन – ७’साठी खेळाडुंचा लिलाव पार पडणार आहे. यावेळी, युवराजही आपल्या संघात असावा अशी इच्छा विराटनं व्यवस्थापनाकडे व्यक्त केलीय. बंगळुरू संघानं विराट कोहली आपल्या संघात असणं महत्त्वाचं वाटतंय. त्यामुळे त्यांनी विराटला आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
या अगोदरच्या सीझनमध्ये युवराज सिंग हा ‘पुणे वॉरियर्स’ या संघाकडून खेळला होता. आता पुणे वॉरियर्स हा संघच अस्तित्वात नसल्यानं युवराजला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा हट्ट विराटनं धरलाय.
युवराजनं आयपीएलमध्ये आतापर्यं ७० सामन्यांत १४७५ धावांसह २९ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, गेल्या वर्षी कॅन्सरवर मात करत पुन्हा मैदानात उतरलेल्या युवीचा परफॉर्मन्स मात्र म्हणावा तितका चांगला नाही. तसंच विजय मल्ल्या यांचा संघ ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ आत्तापर्यंत एकदाही आयपीएल विजेता ठरलेला नाही. त्यामुळे आता आरसीबी संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.