www.24taas.com, मुंबई
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधात फारच कटुता निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सतत होणारा गोळीबार, जवानांच्या कत्तली, यामुळे हे संबंध आणखी बिघडत गेले. यामुळे भारतात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूंना न खेळू देण्याची मागणी होत आहे. हॉकी इंडिया लीगमधील हॉकीपटूंना परत पाठवल्यानंतर आता वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या पाकिस्तानच्या मॅचेस मुंबईतून बाहेर हलवण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्य़ा मॅचेस या अहमदाबादमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुजरात क्रिकेट असोसिएशशननं पाकिस्तानच्या मॅचेस खेळवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश पटेल यांनी हे स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबर मॅचेस होणार आहेत. पाकिस्तान आणि भारतामधील वाढत्या तणावामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान वुमेन्स वर्ल्ड कप मुंबईत होणार आहे. जीसीएने नकार दिल्यानंतर आता वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच धोक्यात आला आहे.