भारत-दक्षिण आफ्रिका काँटे का मुकाबला

टी-20 वर्ल्ड कपच्या दुस-या सेमी फायनलमध्ये हॉट फेव्हरिट टीम इंडियाचा मुकबाला रंगणार आहे तो दक्षिण आफ्रिकेशी. दोन्ही टीम्स बलाढ्य भारत, दक्षिण आफ्रिका,टी-20 वर्ल्ड कप,World T20 2014, India , South Africa असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक काँटे का मुकाबला पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2014, 10:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर
टी-20 वर्ल्ड कपच्या दुस-या सेमी फायनलमध्ये हॉट फेव्हरिट टीम इंडियाचा मुकबाला रंगणार आहे तो दक्षिण आफ्रिकेशी. दोन्ही टीम्स बलाढ्य असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक काँटे का मुकाबला पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.
व्हीओ 1 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशी झाली आहे. लीग मॅचेसमधील चारही मॅचेस भारतीय टीमनं जिंकत विजयी चौकार खेचला. आता भारतीय टीमची खरी कसोटी लागणार आहे ती सेमी फायनलच्या लढतीमध्ये. टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे ते दक्षिण आफ्रिकन टीमचं.
भारतीय टीमनं लीग मॅचमध्ये पाकिस्तान, वेस्ट इंडिज, यजमान बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियन टीमचा धुव्वा उडवत सेमी फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला होता. आता सेमी फायनलच्या मॅचमध्ये धोनीब्रिगेडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान पार करत आपला फायनलचा मार्ग सुकर करावा लागणार आहे. मोक्याच्या क्षणी सिक्सर किंग युवराज फॉर्ममध्ये परतलाय आणि ही बाब टीम इंडियाच्या पथ्यावरच पडणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माकडून टीमला मोठ्या अपेक्षा असणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमची बॉलिंग शानदार झाली आहे. चार लीग मॅचेसमध्ये तीनवेळ बॉलर्सनी मॅन ऑफ द मॅचच्या किताबावर आपलं नाव कोरलं. खासकरून स्पिनर्सनी प्रतिस्पर्धी टीम्च्या बॅट्समनवर अंकूश ठेवण्यात यश मिळवलं. स्पिनर्सना फास्ट बॉलर्सनी योग्य साथ दिली.
आता दुस-यांदा टी-20 वर्ल्ड कपला गवसणी घालण्यासाठी भारतीय टीमला सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुन्हा एकदा सांघिक कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. डेल स्टेन टीम इंडियासाठी धोकादायक ठरणार आहे. तर क्विंटन डी कॉकपासूनही भारतीय टीमला सावध रहाव लागणार आहे.
आता लीग मॅचेसमधील आपला फॉर्म कायम राखत टीम इंडिय़ा सेमी फायनलमध्येही बाजी मारत टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्यात यशस्वी होईल अशी क्रिकेटप्रेमींना असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.