कोल्हापूर-सांगलीच्या सीमेवर असलेल्या शिवराज विद्यालयाने डे बोर्डींगची सुरूवात केलीये. तिथं अॅडमिशन घेतलेली मुलं सकाळीच शाळेत येतात आणि सर्वांगिण विकास प्रक्रियेतून तयार होत संध्याकाळी घरी परततात.
पण हे डे बोर्डींग कुठल्याही मोठ्या शहरातलं नाही तर शिवराज विद्यालयाने हा सुरू केलेला उपक्रम आहे. शहरातल्या मुलांचा सोयी-सुविधांमुळे सर्वांगिण विकास होतो. मात्र ग्रामीण भागातल्या मुलांच्या संर्वांगिण विकासात अनेक अडचणी येत असतात. त्यामुळं हा विषय समोर ठेवून, डे बोर्डींगमध्ये शिक्षणासोबतच कवायती,शारिरीक खेळ,नाच,गाणी शिकवली जातात. शिवाय स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते.
यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण मिळण्यासाठी ‘प्रताप पाटील’ यांनी पुढाकार घेतला. कोणतीही अतिरिक्त फी न आकारता त्यांनी या डे बोर्डींगच्याच इमारतीतच महाविद्यालय सुरू केलंय.
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास किती महत्वाचा आहे हे जाणून त्यांच्यासाठी असं डे बोर्डींग सुरू करणं हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे.