मुंबई : शालेय पटनोंदणीसाठी आता सेल्फी, विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून यापुढे शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागाने आणखी एक नवी शक्कल लढविली आहे. शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. वर्गांमधील हजेरी पडताळणीच्या या नव्या प्रकारामुळे जानेवारीपासून शाळांतील दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा तास ठरणार आहे.
शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार देशातील 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाही असे निरीक्षण नोंदवले गेलंय. जानेवारी 2017पासून ही योजना अमलात येणार आहे.