www.24taas.com, मुंबई
अबू जिंदाल फाडणार पाकिस्तानचा बुरखा ?
काय आहे 26 /11 च्या हल्ल्यामागचे सत्य ?
कोण होता दहशतवाद्यांच्या कंट्रोलरुमचा मास्टरमाईंड ?
26/11 च्या हल्ल्यात काय होती आयएसआयची भूमिका ?
दहशतीचा गुरु
26 अकराच्या दहशतवादी हल्यामागे पाकिस्तानची आय़एसआय आहे यासंदर्भात भारताची सुरक्षा यंत्रणा वारंवार पुरावे देतेय.. पण आता मात्र या सा-या पुराव्याना बळकटी मिळतेय.. पाकीस्तानात 26 अकराच्या हल्ल्यावेळी, कसाबसह अन्य दहशतवाद्यांना हिंदी आणि मराठीचे धडे देणारा अबू जिंदाल हाच कंट्रोलरुम मधून आदेश देत होता.. हा कट जरी तडीस नेण्यात कसाबचा हात असला तर यामागचे मास्टरमाईंड बसले होते पाकिस्तानच्या कंट्रोलरुम मध्ये.. पाकिस्तानात असलेल्या कंट्रोल रुममधून बसलेल्या व्यक्तीनी कसाब आणि त्याच्या साथीदाराना निर्देश दिलेच नसते तर हिंदूस्तानवरचा सर्वात मोठा आतंकवादी हल्लाचा कट तडीस गेला नसता.. आणि हा व्य़क्ती कोणी एक फक्त आतंकवादी नव्हती तर ही होती आतंवाद्याचा हॅँडलर.. याच आतंकवाद्याने लष्कर तय्यैबाच्या सांगण्यावरून देशात ठिकठीकाणी बॉम्बस्फोट केले होते.. पण आता मात्र या व्यक्तीला देशविरोधी कारवाया करणे शक्य होणार नाहीय.. कारण त्याच्याच राष्ट्रविघातक कारवायानी त्याला पोहोचवलय गजाआड...
कोल्ह्याप्रमाण धुर्त आणि विखारी विचार असणा-या या क्रुरक्रम्याने आतापर्यंत देशातल्या सुरक्षा यंत्रणेला चकमा दिला होता.. आणि या सर्वात मोठ्या आतंकवाद्याचे नाव आहे, अबू जिंदाल.. भारतातल्या सुरक्षा यंत्रणाना अबू जिंदाल उर्फ सय्यद जबीउद्दीन उर्फ रियासत अली अशा तब्बल 26 नावानी अबू चकमा देत होता.. अखेर दहा वर्षांनी अबू आता सुरक्षा यंत्रणाच्या जाळ्यात सापडलाय.. सुरक्षा यंत्रणाच्या सखोल चौकशीतून 26 /11 चे सत्य सा-या जगासमोर येणार आहे.पण केवळ सुरक्षा यंत्रणेलाच नाही तर सा-या देशाला प्रतिक्षा आहे ती काही सवालांच्या उत्तराची
काय आहे 26 /11 च्या हल्ल्यामागचे सत्य ?
कोण होता दहशतवाद्यांच्या कंट्रोलरुमचा मास्टरमाईंड ?
26/11 च्या हल्ल्यात काय होती आयएसआयची भूंमिका ?
आतापर्यंत व्हॉईस सेंपल आणि अधिक तपासाअंती सुरक्षा एजन्सी या अनेक चेह-यांना शोधण्यात यशस्वी झाल्यायत.. पण हा हल्ला आयएसआयच्या थेट देखरेखीखाली पुर्ण झाला का याचे मात्र गुढ काय आहे.. आणि या प्रश्नाचे उत्तरच पाकिस्तानचा बुरखा फाडणार आहे. आणि या सर्वाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी 26 /11 च्या हल्लातील एकमेव जिवतं हल्लेखोर अजमल अमीर कसाब नंतर सर्वात मोठा धागा आहे तो अबू जिंदाल.. 26/11 प्रकरणी सुरक्षा यंत्रणानी दहशतवाद्याच्या कंट्रोलरुममधून येणा-या आतंकवाद्याचे कॉलचे अतिरिक्त व्हॉईस सेंपलची मागणी करतायत.. आता अबू जिंदालच्या व्हॉईस टेस्ट वरुन सुरक्षा यंत्रणा हे सिद्ध करु शकणार आहे की, 26 /11 ला पाकिस्तानाच्या आतंकवाद्याच्या कंट्रोल रुममधून निर्देश देणारा अबू जिंदाल हाच होता. आणि म्हणूनच आता जिंदालने जे रहस्य उलगडेल त्यातून फाडला जाणारं आहे पाकिस्तानचा आणि आयएसआयचा बुरखा.. मुळचा बिडचा असणारा अबू जिंदाल हा पाकिस्तानात लष्कराच्या कॅम्पमध्ये जातो काय आणि 26 /11 साठी हॅंडलर बनतो काय.. या सा-याच गोष्टी आता बारकाईनं तपासण्याची वेळ आलीय.. कारण याच अबू जिंदालवर सोपवलेल्या दहशतीवादी कारवायाच्या धमाक्यानंतर अबू हा लष्कर ए तय्यबाच्या गळ्यातला ताईत बनला होता.. अबु जिंदाल उर्फ अबू हमजा उर्फ सईद जबाऊद्दीन..