रविंद्र कांबळे, www.24taas.com, सांगली
दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय.पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतक-यांनी काढून टाकल्या आहेत. डाळिंबाची निर्यात करणा-या या तालुक्याला चारशे कोटींच्या परकीय चलनाला फटका यामुळे बसलाय.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तालुका डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात 1990 साली डाळिंबाच्या लागवडीला सुरुवात झाली. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने भगवा, गणेश, मृदुला या सारख्या अनेक जातींच्या डाळिंबांचं दर्जेदार उत्पादन घेतलं. युरोप, अखाती देश, रशिया, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी निर्यात करुन आपली कर्तबागारी सिद्ध केली. गेल्या 22 वर्षांत इथली उलाढाल चारशे कोटींवर जाऊन पोहोचली...
मात्र गेल्या दोन वर्षाच्या पावसाच्या अनियमतपणामुळे इथल्या शेतक-यांवर संकट कोसळंलंय. पावसाअभावी इथल्या बागा जगवणही शक्य नसल्यानं शेतक-यांनी या तोडण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यात पाणी आणि चा-याची वाणवा असल्याने जनावरांची परवड होतेय. इथला शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकतोय.अशा प्रतीकुल परिस्थीतीमुळे सांगली जिल्ह्यातील आठ तालुक्य़ात दुष्काळ जाहिर करण्यात आलेत.
दुष्काळग्रस्त तालुक्यांना होणा-या शासनाची मदत हि नेहमीच चिंतेची आणि शंकेची बाब ठरलीय.अनेक घोटाळे आणि गैरव्य़वस्थापनेमुळे शेतक-यांच्या हाती काहीच येत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेने कायमस्वरुपी दुष्काळावर मात करणारी पारदर्शक उपाय योजावेत ज्यामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने न्याय मिळेल.