ही दुनियाच मोठी आहे अद्भुत!
इथं कोणतीच गोष्ट नाही वर्ज!
वास्तवाप्रमाणेच येतो अनुभव!
प्रेम, द्वेष, मोह, माया, वेदना सगळं काही आहे तिथं!
अशक्यही शक्य होतं तिथं!
त्या दुनियेला काळाचं नाही बंधन!
पण त्या दुनियेचं वास्तव आहे वेगळं!
प्रत्येक माणसाने केलीय त्या दुनियेची सफर!
ती सफरही मोठी असते अनोखी!
कधी श्वास रोखून धरायला लावणारी!
तर कधी आनंद देणारी!
माणसासाठी ते नेहमीच राहिलंय एक गूढ!
प्राचीन काळापासून होतेय त्यावर चर्चा!
पण आता झालाय त्याचा उलगडा!
कॅनडातील मॉण्ट्रियल विद्यापीठातील एका अभ्यास गटाने तब्बल ११ वर्ष माणसाच्या स्वप्नांचा अभ्यास करुन स्वप्नांच्या दुनियाचा उलगडा करण्यात यश मिळवल्याचा दावा केलाय. स्वप्न... एक असं विश्व जे नेहमीच माणासासाठी गूढ बनून राहिलं आहे. कारण स्वप्नंचं जगच निराळं आहे. झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण मनुष्य निद्रीस्त होताच ती व्यक्ती एका अनोख्या विश्वात प्रवेश करते आणि ते विश्व असतं स्वप्नांचं... तिथली प्रत्येक घटना वास्तवाप्रमाणे भासते. त्यामुळे स्वप्न पाहणा-या व्यक्तीला वास्तव आणि स्वप्न यांच्यात फरक करणं अवघड होऊन बसतं. जोपर्यंत मनुष्य स्वप्नात असतो तोपर्यंत त्याला वास्तवाचं भान रहात नाही. ती व्यक्ती स्वप्नालाच वास्तव मानत असते. मात्र, जेव्हा स्वप्न भंग होतं तेव्हा मणुष्याला वास्तवाची जाण होते. पण तोपर्यंत ज्या विश्वाचा अनुभव माणसाला येतो ते काही वेगळंच असतं. गेली अनेक वर्षांपासून या अनोख्या विश्वाचा अभ्यास केला जात आहे. स्वप्नांचं गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वप्न हे माणसाला सुख, दु:खाचा अनुभव देतात. वास्तवाचा क्षणिक अनुभव देणारी स्वप्नांची दुनिया स्त्री-पुरुषांसाठी एक सारखीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला पडणारं स्वप्न हे वेगळं असतं. पण, जेव्हा शेकडो व्यक्तींच्या स्वप्नांचा अभ्यास केला गेला तेव्हा काही स्वप्न हे कॉमन असल्याचं समोर आलं. मॉण्ट्रियल विद्यापीठातील अभ्यास गटाने स्वप्नांचं रहस्य उलगडण्यासाठी शेकडो लोकांच्या दैनंदिन स्वप्नांचा अभ्यास केला आहे. लोकांना वारंवार कोणती स्वप्न पडतात, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यांची वर्गवारी केली. या अभ्यासादरम्यान त्यांनी स्वप्नांची ५६ विभागात वर्गवारी केली आणि त्यानंतर आपला निष्कर्ष मांडला आहे. त्या निष्कर्षातून स्वप्नाविषयाच्या काही महत्त्वाच्या बाबींचा उलगडा करण्यात आल्याचा दावा त्या गटाने केला आहे. सर्वसामान्यपणे लोकांना कोणती स्वप्न पडतात? त्यातील वारंवार पडणारी स्वप्न कोणती? पुरुषांना कोणती स्वप्न पडतात? स्त्रियांच्या स्वप्नांचा विषय कोणता असतो? अशा काही प्रश्नांचा उलगडा करण्यात आल्याचा दावा मॉण्ट्रियलच्या अभ्यास गटाने केलाय.
काय पडतात पुरुषांना स्वप्न...
स्वप्न सर्वांनाच पडतात. त्यात महिला-पुरुष असा भेद नाही. पण त्यांना जी स्वप्न पडतात त्यांचा विषय मात्र वेगवेगळा असतो. पुरुषांना तसेच स्त्रियांना वारंवार पडणा-या स्वप्नांचा उलगडा आता झाला आहे. पुरुषांना कोणती स्वप्न वारंवार पडतात त्यावर आता एक नजर टाकणार आहोत. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं. मनात दडपलेल्या इच्छांच प्रतिबिंब स्वप्नात उमटतं असं नेहमीच सांगितलं जातं. पण, त्यावरही वेगवेगळे मत प्रवाह आहेत. स्वप्न पहाण्यासाठी माणूस स्वप्नाळू असण्याची आवश्यकता नसते. स्वप्न अपोआप पडतात. त्याचा विषय कधी कोणता असेल हे आधी ठरवता येत नाही. त्याला स्थळ- काळाचं बंधन नसतं. पण त्याचा विषय मात्र अनेकांच्या बाबातीत एक सराखाच असू शकतो. कॅनडाच्या मॉण्ट्रियल विद्यापीठातील एका अभ्यास गटाने स्त्री-पुरुषांच्या स्वप्नांविषयी सखोल अभ्यास केला असून स्त्री- पुरुषांना सर्वाधिक कोणती स्वप्न पडतात याचं विश्लेषण केलं आहे. पुरुषांना पडणाऱ्या स्वप्नांमध्ये केवळ कामविचारांवर भर असल्याचं पहायला मिळालं आहे. टक्केवारीत विचार केल्यास हे प्रमाण जवळपास ८५ टक्के इतकं असल्याचा दावा मॉण्ट्रियलच्या अभ्यास गटाने केलाय. पुरुषांची स्वप्न ही याच विषयाने सजलेली असतात. आठवड्यातून वारंवार पडणाऱ्या स्वप्नांमध्ये हाच याच विषयाचा समावेश असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. पुरुषांच्या मनाची अर्धजागृत अवस्था ही त्या नाजूक विषयावर केंद्रीत असल्याचं पहाणीतून उघड झालं आहे. अनेक पुरुषांच्य