www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विंदू सिंगला अटक केल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरी, मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप जप्त केलाय. त्यातली कोड लँग्वेज ‘झी मीडिया’च्या हाती लागलीय.
विंदूच्या कोडवर्डचे अर्थ काय?
गुरुजी - गुरुनाथ मयप्पन
जॅक - विंदू दारासिंग
शानू - एक बुकी
रमेश भाई - बुकी रमेश व्यास
पीजे भाई - बुकी पवन जयपूर
एसजे भाई दिलवाला - बुकी संजय जयपूर
बनी - दिल्लीतला बडा बुकी
चिडिया - हवाला ऑपरेटर
विंदूच्या डायरीत आढळलेल्या कोडवर्डमध्ये लिहलंय काय... पाहा....
गुरूजी टू जॅक - ५ लगाया ३ खाया (अर्थ - मय्यपननं ५ लाख सट्टा लावण्यासाठी विंदूला दिले होते. त्यापैकी ३ लाखांचा सट्टा विंदू हरला)
शानू टू जॅक - २ गया (अर्थ - एका बुकीनं २ लाख रुपये विंदूला दिले होते)
रमेश भाय – १ आया (अर्थ - बुकी रमेश व्यासनं एक लाख विंदूला दिले होते)
पीडी झीरो (अर्थ - उरले शून्य)
गुरूजी टू जॅक - लगाया ३ - खाया ० - दिया ५ (अर्थ - मयप्पननं ३ लाखांचा सट्टा लावला. त्यावेळी तो ५ लाख जिंकला)
पीजे भाय - १ आया - चिडीया (अर्थ - बुकी पवन जयपूरने चिडीया म्हणजे हवाला ऑपरेटरतर्फे १ लाख विंदूला दिले)
विंदूला सट्टा लावण्याचा नाद होता. त्याच्याकडे आढळलेल्या कोडवर्डनं पोलिसांची सट्टेबाजांविरुद्ध असलेली पकड आणखी घट्ट होणार आहे.
फोटोफीचर विंदूच्या कोडवर्डसचा अर्थ...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.