www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एखाद्या मॅचवर सट्टा लागलेला आपण अनेकदा पाहिलंय. मात्र, सध्या चर्चेत असलेल्या बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावरही सट्टा लागलाय. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून जाणार की राहणार यावर आता सट्टा लागलाय.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांची खुर्ची जाणार की राहणार? ही चर्चा भारतीय क्रिकेट जगतामध्ये रंगतेय. या चर्चेमध्ये आता सट्टेबाजारही मागे राहिला नाही. जावयानं केलेल्या कृत्याची शिक्षा श्रीनिवासन यांना भोगावी लागणार का? भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं कृत्य श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांनी केलंय. जावाई सट्टा लावल्यामुळे अटकेत आहे. आयपीएल सट्ट्यामुळे बदनाम झालंय तर क्रिकेटर्स सट्टेबाजीमुळे जेलची हवा खातायत. आता उरलेत फक्त बीसीसीआय अध्यक्ष. आता तर श्रीनिवासन यांनाच सट्ट्यानं बाजारात विकायला ठेवलंय.
श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार यावर ३० पैशांचा भाव लागला आहे. तर ३२ पैसे ते अध्यक्ष पदावरून जाणार असा भाव लागलाय.
श्रीनिवासन याबाबत काय निर्णय घेतायत याची कल्पना तर कोणालाच नाही. पण, ज्या सट्टेबाजीमुळे श्रीनिवासन यांची खुर्ची जाणार आहे त्यावरही सट्टा लागतोय. यामध्येही फिक्सिंग होणार नाही एवढीच सर्वांची इच्छा....
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.