www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेशोत्सवाच्या दिवशी स्नान करून सोनं, तांबं किंवा मातीच्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशजींच्या छोट्या प्रतिमेला नव्या कोऱ्या कलशामध्ये पाण्यात टाकून त्या कलशाचं तोंडं स्वच्छ कपड्यानं बांधलं जातं. त्यानंतर मूर्तीची गुलाल चढवून पूजा केली जाते.
गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून २१ लाडू ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. यातील ५ लाडू गणेशाच्या मूर्तीजवळ ठेवतात आणि इतर भक्तांमध्ये वाटून टाकतात. कोणतंही कार्य आरंभ करण्याअगोदर गणेशाची आरती आणि पूजा केली जाते. त्यामुळे सगळी कामं आणि मनोकामना निश्चित पूर्ण होतात, असं म्हटलं जातं.
गणेशाचं पूजन बऱ्याचदा सायंकाळी केली जाते. या पूजेत चंद्राला अर्ध्य दाखवून ब्राम्हणांना भोजन आणि दक्षिणा दिली जाते. यामध्ये चंद्राला अर्ध्य देण्याचं तात्पर्य म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राचं दर्शन केलं जातं नाही.
पूर्ण दहा दिवसांपर्यंत गणेशाची स्थापना काही जणांना व्यस्त जीवनामुळे साध्य होत नाही. त्यामुळे केवळ दीड दिवस, पाच दिवस गणेशाची प्रतिष्ठापणा केली जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.