गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2014, 09:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.
आपल्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता. या खटल्यासंदर्भात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं ही शिक्षा सुनावलीय.
नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला.
त्यामुळे, गडकरी यांच्या अवमान प्रकरणी कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. आता, पुढचे दोन दिवस अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.