www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता राजकीय नेत्यांशी तुम्ही लाईव्ह संवाद साधू शकता. यासाठी फेसबुकने तशी व्यवस्था केली आहे. सोशल नेटवर्कींगमधील आघाडीच्या फेसबुकने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजवरून कोणीही फेसबुक वापरकर्ता नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी लाईव्ह संवाद साधू शकणार आहे.
फेसबुक इंडियाने देशातील राजकीय नेत्यांशी थेट संवाद साधता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फेसबुक टॉक लाईव्ह या पेजच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या पेजवरून आपले प्रश्न, दृष्टीकोन आणि आगामी लक्ष्य अशाप्रकारे देशाच्या भवितव्याबाबत कोणता नेता काय करू इच्छितो? या संदर्भात थेट नेत्यांशी बोलण्याची(चॅट) संधी फेसबुककरांना मिळणार आहे.
३ मार्च ते ८ मार्च २०१४ दरम्यान रात्री ८ ते ९ च्या दरम्यान https://www.facebook.com/FacebookIndia या पेजवरून नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी चॅट करता येणार आहे. जनतेने विचारलेल्या प्रश्नांचे प्रतिनिधीत्व पत्रकार मधू त्रेहान करणार आहेत.
विशेष म्हणजे https://talks.facebooklive.com/ या संकेतस्थळावर होणाऱ्या संवादाचे लाईव्ह अपडेट्सही पाहाता येतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.