www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर परदेशी मीडियाचं बारीक लक्ष आहे. जगात मागील दशकात भारताची आर्थिक आणि राजकीय शक्ती वाढली आहे.
भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनही पाहिलं जातं. यामुळे भारताच्या राजकारणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम स्वाभाविक आहे.
कोणतं सरकार काय धोरणं घेणार यावर बरचं काही अवलंबून असतं. परदेशी मीडियाने नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणूक सर्व्हेक्षणातून हा कौल देण्यात आला आहे.
मात्र भारतात कोणतं सरकार येणार यावर अजुनही तर्क लावले जात आहेत. काँग्रेसचं सरकार जाऊन मोदींचं सरकार आलं तर नेमका काय बदल होईल आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.