हेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
नरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
मनिष तिवारींनी केली मोदींच्या मुलाखतीची काट-छाट?
नरेंद्र मोदींच्या दूरदर्शनवरील मुलाखतीचं प्रकरण आता चांगलचं चिघळत चाललं आहे. हा वाद समोर आल्यानंतर दूरदर्शनचे ‘सीईओ’ जवाहर सरकार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांच्यावर टीका केली आहे.
कोक्राझारमधील हत्याकांडाला मोदीच जबाबदार - सिब्बल
कोक्राझारमधील हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. मोदींमुळे देशात जातियवाद फोफावणार आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडून तिखट प्रतिक्रीया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
गुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.
मोदी, तर मी निवृत्त होईन - अहमद पटेल
नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेला दावा खरा ठरला तर मी सार्वजनिक राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करीन, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी दिलेय.
`...पण नरेंद्र मोदींनी प्रियांकाला कधी बेटी म्हटलंच नव्हतं`
नरेंद्र मोदींनी कधीच प्रियांका गांधींना आपली बेटी म्हटलं नाही, असं जाहीर करत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसनं या चर्चेतील हवाच काढून टाकलीय.
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा मोदींची फॅन
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची फॅन आहे. वाराणसीमध्ये आज आलेल्या प्रीतीनं मोदींना पाठिंबा दिलाय. देशाला कणखर नेतृत्त्वाची गरज असल्याचं प्रीतीनं सांगितलंय.
मोदींना होणार जन्मठेप, राहुल होणार पंतप्रधान : बेनी प्रसाद वर्मा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात
... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी
उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.
चेन्नई स्फोटांनंतर नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढली
चेन्नईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अहमद पटेल हे माझे चांगले मित्र होते: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दिलेल्या दूरदर्शनच्या मुलाखातीचा वाद संपतच नाही.
मोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे
गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो
‘मी राजीव गांधींची मुलगी’, प्रियांकाचा मोदींना तडाखा
‘मी राजीव गांधींची मुलगी आहे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शाब्दिक तडाखा दिलाय.
पंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ
भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.
नरेंद्र मोदींवर अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.
निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
अमृता रायचा ईमेल आणि कम्प्युटर कुणी हॅक केला?
टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.
निवडणुकीच्या गर्मीनंतर नेते होत आहेत `कूल`
लहान मुलं जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. तसंच ज्या राज्यात आता निवडणुका संपल्या आहेत.
मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.