मोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान
ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.
दिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड
टीव्ही अँकर अमृता रायसोबतचे संबंध अखेर दिग्विजय सिंह यांनी मान्य केले आहेत. अमृता राय यांच्यासोबत असलेले संबंध ही आपली खासगी बाब आहे, तसेच अमृता रायने आपल्या पतीशी कायदेशीर फारकत घेतली असल्याचं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
चिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
कणकवलीत राणे समर्थकांचा राडा, शिवसैनिकावर हल्ला
उद्योगमंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सर्वांनाच माहित आहे कणकवलीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कोकणात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेत. कणकवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांना बेदम मारहाण करण्यात आलीय.
लोकसभा निवडणूक : यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांनी लखनऊमध्ये मतदान केलं. राजनाथ सिंह आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणामध्ये बिग फाईट आहे. तर गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणा-या लालकृष्ण अडवाणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.
`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
बहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.
दहा प्रमुख लढती : मोदी, सोनिया गांधी, अडवाणींचे भवितव्य पणाला
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.
आचारसंहिता शिथील, राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाल्यानंतर आज राज्यमंत्रीमंडळाची पहिली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गारपीट ग्रस्तांच्या मदतीबाबत तसंच राणे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यासाठी आज मतदान
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे.
माचिसच्या काडीनं मिटवता येते मतदानाची शाई!
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं दोनदा मतदान करण्याचा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल... पण, बोटांवर शाई असताना दुसऱ्यांदा कसं मतदान करणार? हा त्यांना न पडलेला सल्ला तुम्हाला जरुर पडला असेल...तर
पंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका
प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
LIVE कार्यक्रमात `त्यानं` स्वत:ला पेटवून नेत्याला मारली मिठी
लाईव्ह टीव्ही शो दरम्यान एका तरुणानं स्वत:ला पेटवून घेऊन बसपा नेत्याला मिठी मारली... ही धक्कादायक घटना घडलीय उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये...
शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची तातडीची बैठक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक राष्ट्रवादी भवनात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात येतंय.
सट्टा बाजारात राहुल गांधींचा भाव उतरला
सट्टा बाजारात एका महिन्याआधी राहुल गांधी यांचा भाव 6 ते 7 रूपये होता, तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा भाव 500 ते 525 रूपये होता.
मोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.
मोदींवर हल्ल्यासाठी दहशतवादी तयार
इंडियन मुजाहिद्दीन आणि `सिमी`या दहशतवादी संघटनांकडून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धोका निर्माण झाला आहे.
पेड न्यूज : चार लोकसभा उमेदवारांवर ठपका
पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.
काँग्रेस बुडणारं जहाज, सोनिया-राहुलचे दिवस संपले: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.