www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मोठी मुलगी उपिंदर सिंह आता आपल्या वडिलांच्या बचावासाठी पुढे आलीय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सगळ्यात `कमकुवत पंतप्रधान` म्हणून हिणवलं गेल्यानं उपिंदर दु:खी झाल्यात. त्यामुळे, त्यांनी मनमोहन सिंग यांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर जोरदार टीका केलीय.
`हे म्हणजे पाठीत सुरा खुपसण्यासारखं आहे` असं म्हणत त्यांनी टीकाकारांवर जोरदार हल्ला केलाय. विरोधकांचं हे वर्तन म्हणजे विश्वासघातकी आणि अनैतिक अभ्यास असल्याचं त्या म्हणतात. यावेळी, त्यांनी पुस्तकाचं टायमिंग आणि कंटेटवरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
`संजय बारू यांनी पंतप्रधानांच्या विश्वास आणि आपल्या सीमेचं उल्लंघन केलंय... ते पंतप्रधानांच्या वतीनं बोलत नाहीत...` असंही उपिंदर यांनी म्हटलंय.
संजय बारू यांनी २००४ ते २००८ या कालात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मीडिया सल्लागार म्हणून काम पाहिलंय.
संजय बारू यांनी आपल्या `द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर - द मेकिंग अॅन्ड अनमेकिंग` या पुस्तकात पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत. अत्यंत महत्त्वपूर्ण फायलींवर सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय घेतले जात होते. पीएमओ कार्यालयातले काही खास अधिकारी दररोज सोनिया गांधींची भेट घेऊन दररोजच्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहचवत होते, असं सांगत बारू यांनी मनमोहन सिंग यांना आत्तापर्यंतचे सर्वात कमकुवत पंतप्रधान म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.