www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महाराष्ट्राचा कारभार हा पार्टटाइम आहे. मुख्यमंत्री नेहमीच बदत राहत आहे. तसेच ज्या पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला त्याच पुण्यात काँग्रेसला उमेदवार आयात करावा लागलो, यावरून काँग्रेसची स्थिती काय आहे हे लक्षात येते अशी टीका करत विकासासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले.
पुण्यातील लोकसभेचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारासाठी पुण्यातील एसपी मैदानावर मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. मोदी यांनी जोशपूर्ण भाषण करीत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसह राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. पवार हे सोनिया गांधीचे सरदार आहे, अशी टीका मोदी यांनी केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली. तसेच अन्नसुरक्षा विधेयक, नरेगा, कॅग, नियोजन आयोगावरून मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले आहे. काँग्रेसच्या निष्पभ्र मंत्र्यांना काँग्रेसने प्रमोशन दिले आहे. देशातील काळा पैसा आणणे महत्वाचे असून आपले सरकार आल्यास विदेशातील पैसा आणला जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी उपस्थितांना दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ