www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुगल इंडियाने भारत-पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर दोन मित्र कसे जवळ येतात, अशी एक जाहिरात बनवली होती ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.
यानंतर गुगल इंडियाने लोकसभा निवडणुकीवर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील एक 97 वर्षाच्या नागरिकाची कहाणी लोकांसमोर ठेवली आहे.
हिमाचल प्रदेशातील 97 वर्षांचे श्याम नेगी यांनी देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ते आतापर्यंत मतदान केलं आहे. श्याम नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आहेत.
1951 साली त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं होतं. हिमाचल प्रदेशातील किन्नोरमध्ये बर्फामुळे रस्ते बंद होतात. हिमाचल प्रदेशात 1951 मध्ये काही भागात सहा महिने आधी मतदान करण्यात आलं होतं.
श्याम सिंह नेगी हे शाळा मास्तर होते. नेगी यांनी 1951 पासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं. व्हिडीओत त्यांनी आपल्या लोकशाहीला मजबूत करणे महत्वाचं आहे, यासाठी मतदान करा, असं म्हटलं आहे.
सहा दिवसांआधी यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओला जवळ-जवळ 5 लाख लोकांनी पाहिला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.