मुंबईतल्या उमेदवारांवरही सट्टा, कोण मारणार बाजी?

देशात निवडणुकांच्या निकालावर सट्टेबाजार तेज झालाय. तसंच मुंबईतही उमेदवारांवर सट्टेबाजांनी सट्टा लावलाय. कसा लागतो हा सट्टा..

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 13, 2014, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात निवडणुकांच्या निकालावर सट्टेबाजार तेज झालाय. तसंच मुंबईतही उमेदवारांवर सट्टेबाजांनी सट्टा लावलाय. कसा लागतो हा सट्टा..
पाहा उदाहरण
समजा एका मतदारसंघातून `अ` आणि `ब` हे दोन उमेदवार आहेत. `अ`वर ०५ पैसे सट्टा लागलाय तर `अ` जिंकण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे `अ`वर सट्टा लावणाऱ्याला `अ` जिंकल्यास एक रुपयाला १५ पैसे मिळणार. तर `अ` हारणार यावर सट्टा लावल्यास १ रुपयाला ८० पैसे मिळणार
मुंबईतल्या कोणत्या उमेदवारांवर किती सट्टा
दक्षिण मुंबई
@ अरविंद सावंत शिवसेना - ४५ पैसे
@ बाळा नांदगावकर - मनसे - ८० पैसे
@ मिलिंद देवरा - काँग्रेस - १० पैसे
दक्षिण मुंबईत सट्टेबाजांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा निसटता विजय होणार असल्याचं भाकित केलंय. मनसे या ठिकाणी शिवसेनेला पाडण्यात यशस्वी होईल असा अंदाज सट्टेबाजांचा आहे. तर काँग्रेसचे मिलींद देवरा हे १ ते १० हजार मतांनी विजयी होतील असा ही अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.
दक्षिण मध्य मुंबई
@ राहुल शेवाळे - शिवसेना - ०५ पैसे
@ एकनाथ गायकवाड - काँग्रेस - २७ पैसे
@ आदित्य शिरोडकर - मनसे - ५० पैसे
दक्षिण मध्य मुंबईत खऱ्या अर्थानं पराभव हा मनसेचा आहे. कारण या ठिकाणी मनसेचा दारुण पराभव होईल असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. तर शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार असल्याचा सट्टेबाजांचा दावा आहे. तर एकनाथ गायकवाड यांचा २५ ते ५० हजार मतांनी पराभव होईल असं भाकित सट्टेबाजांनी वर्तवला आहे.
उत्तर मध्य मुंबई
@ प्रिया दत्त - काँग्रेस - १७ पैसे
@ पुनम महाजन - भाजप - १४ पैसे
@ फरहान आझमी - समाजवादी पक्ष - ९० पैसे
उत्तर मध्य मुंबई मध्ये सर्वात धक्कादायक निकाल लागणार असल्याचा सट्टेबाजांचा दावा आहे. या मतदार संघात मोदी लाटेत आणि काँग्रेसच्या गटबाजीमुळे प्रिया दत्त यांचा पराभव होतं असल्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे. पण, गेल्या निवडणूकीतील पावणे दोन लाखांचा लीड तोडून पूनम महाजन निवडून येतील का? यावर सट्टेबाजही संभ्रमात आहेत. म्हणून त्यांनी प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांच्यात फक्त ३ पैशांचा फरक ठेवलाय. स्वतः सट्टेबाजांनाही या ठिकाणी त्याचं नुकसान होताना दिसतंय. तर फरहान आझमी यांना ३० हजारांच्यावर मत मिळणार नाही, असं मत सट्टेबाजांचं आहे.
उत्तर पश्चिम मुंबई
@ गुरुदास कामत - काँग्रेस - २० पैसे
@ गजानन किर्तीकर - शिवसेना - ७ पैसे
@ महेश मांजरेकर - मनसे - ६७ पैसे
या मतदार संघातून सट्टेबाजांनी मोदी लाटेचा फ़ायदा शिवसेनेला होणार असून शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांचा अगदी थोड्या मतांनी विजय होणार असल्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे. तर गुरुदास कामत यांचा कमीअधिक फरकानं पराभव होणार असल्याचा सट्टेबाजांचा दावा आहे. तर महेश मांजरेकर १ लाख मतांचाही टप्पा गाठणार नसल्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे.
उत्तर मुंबई
@ गोपाळ शेट्टी - भाजप - ०३ पैसे
@ संजय निरुपम - काँग्रेस - ४० पैसे
या मतदार संघात थेट लढत असल्यानं आणि यावेळी मनसेनं आपला उमेदवार या मतदार संघात ऊभा न केल्यानं भाजपचे गोपाळ शेट्टी यांचा किमान ६० हजार मतांनी विजयी होणार असल्याचा दावा सट्टेबाजांचा आहे. या मुंबईत उत्तर मुंबई हा एकमेव असा मतदार संघ आहे ज्या ठिकाणी भाजपला सर्वच पक्षांनी मदत केली आहे.
उत्तर पुर्व मुंबई
@ किरीट सोमय्या - भाजप - ३ पैसे
@ संजय दिना पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस - ३४ पैसे
@ मेधा पाटकर - आम आमदी पक्ष - ७८ पैसे
उत्तर पुर्व मुंबईतही मोदींच्या लाटेत भाजपचे किरीट सोम्माय्या यांचा विजय होणार असल्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे. किरीट सोमय्या कमीत कमी ४० हजार मतांनी निवडणून येतील असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. तर मनसेनं शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीला मनसेनं केलेल्या मदतीमुळे संजय पाटील यांचा होणारा दारुन पराभव टळला असल्याचं सट्टेबाज़ म्हणतायेत. तर आपच्या मेधा पाटकर यांना जास्तीत जास्त ४० ते ४५ हजार मत पड़तील असा अंदाज सट्टेबाजांचा आहे.
ठाणे
@ संजीव नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस
@ राजन विचारे - शिवसेना
@ अभिजीत पानसे - मनसे
ठाणे लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांचा विजय पक्का असून ते गेल्या वेळी