www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं सांगितल्यानंतर हजारो सवाल उपस्थित केले जात आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नावाची देशभर चर्चा असल्याने अचानक समोर आलेल्या या गोष्टीमुळे एवढी चर्चा होणे स्वाभाविक आहे.
नरेंद्र मोदी यांच्या लग्नाच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे भाऊ सोमाभाई दामोदर दास मोदी हे मोदींच्या पाठिशी उभे ठाकले आहेत.
नरेंद्र मोदी यांचं लग्न आजपासून 40 - 50 वर्षांपूर्वी झालं आहे. नरेंद्र मोदी यांनी या संसाराचा भोगविलास सोडून गृह त्याग केला होता. आजही तो त्याग कायम असल्याचं सोमाभाई म्हणतात.
नरेंद्र मोदी यांच्या लग्नाची त्यांच्या प्रतिष्ठेसोबत तुलना करणे योग्य नसल्याचं, नरेंद्र मोदी यांचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी म्हटलं आहे.
आम्ही गरीब परिवारात जन्मला आलो, आमचं परिवार रूढीवादी होतं, परिवारात शिक्षण फार थोडकं होतं. आई-वडिलांनी नरेंद्र मोदी यांचा लहान वयातच विवाह उरकला असल्याची माहिती सोमाभाई यांनी दिलीय.
मात्र मोदी 40-50 वर्षांपासून आपल्या संसाराचा त्याग करून अलिप्त आहेत, जसोदाबेन या शैक्षणिक कार्य करतात, आपल्या वडिलांच्या घरी राहतात, असं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांचे भाऊ सोमाभाई दास मोदी यांनी दिलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.