www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा/नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".
मोदींनी आपण विवाहित असल्याची माहिती देताच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्वात आधी ट्वीट केलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. दिग्विजय यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मोदींनी आपला विवाह स्वीकारलाय, मोदींच्या या कुबलीनंतर काय देशातील महिला आता मोदींवर विश्वास ठेवू शकतील. ज्यांनी आपली पत्नी आणि एका महिलेला हक्कापासून वंचित ठेवलंय?मोदींच्या विरोधात मत द्या."
वडोदरा लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना दिल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी पहिल्यांदाच विवाहित असल्याचं लिहिलंय. मोदींनी आतापर्यंत पत्नीबाबत दिल्या जाणाऱ्या माहितीचा कॉलम रिकामा ठेवला होता. 2012मध्ये विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरतांना मोदींनी तो कॉलम रिकामा ठेवला होता, तर 2014मधील लोकसभा निवडणुकीच्या वाराणसीच्या उमेदवारी अर्जात पत्नीची संपत्ती या कॉलममध्ये "मला याबाबत काही माहिती नाही,असं लिहिलं होतं."
काँग्रेसनं यापूर्वीच मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतांना आपल्या विवाहित स्थितीबाबत खरं सांगावं अशी मागणी केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.