मुंबई : आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पाण्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची मात्रा शरीरात योग्य असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत असते.
वजन कमी करण्याच्या थेरपीमध्ये वॉटर थेरपीचाही समावेश आहे. पाणी पिऊन आपण १० दिवसांत ४-५ किलोपर्यंत वजन कमी करु शकतो.
१. सकाळी उठल्यावर काहीही खाण्याआधी दीड ग्लास पाणी प्या.
२. नाश्ता केल्यानंतर १-२ ग्लास पाणी प्या.
३. दिवसभरात जेव्हा कधीही चहा अथवा कॉफी पिणार असाल त्यापूर्वी एक ग्लास पाणी जरुर प्या. यामुळे शरीरातील अॅसिड इफेक्ट कमी होईल.
४. लंच अथवा डिनर घेण्याआधी २० मिनिटे १-२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे भूक कमी होईल आणि अधिक खाणे होणार नाही.
५. झोपण्याआधी काही तास १-२ ग्लास पाणी जरुर प्या. त्यामुळे रात्रीची भूक लागणार नाही. तसेच सकाळी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर निघण्यास मदत होईल.
६. दिवसातून एकाच वेळेस अधिक पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.
७. दिवस सोडा अथवा ज्यूस पिण्यापेक्षा पाणी प्या. यामुळे शरीरात साखरचे प्रमाण कमी होईल.